औरंगाबाद :- सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साहेब, मी बायकोला मारून आलोय, मला अटक करा,’ असे म्हणत आपतगाव ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याचा पती रविवारी दुपारी २ वाजता चिकलठाणा पाेलिस ठाण्यात हजर झाला. कडुबा भागाजी हजारे (४२) असे आरोपीचे नाव असून त्याने ठाण्यात येण्याच्या तासाभरापूर्वी पत्नी सुनीता (३८) यांचा शेतात गळा दाबून खून केला. चिकलठाणा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
रविवारी दुपारी चिकलठाणा पोलिस ठाण्यात दैनंदिन कामे सुरू होते. पोलिस कर्मचारी काही स्थानिकांच्या तक्रारी ऐकत होते. तेवढ्यात कडुबा ठाण्यात आला. समोर बसलेल्या अधिकाऱ्याने काय काम आहे? असे विचारले. तेव्हा ‘साहेब, मी बायकोला मारून आलाेय, मला अटक करा,’ असे चेहऱ्यावर शांत भाव ठेवून त्याने सांगितले. त्याचे हे बाेलणे एेकून क्षणभर पाेलिस हैराण झाले. उपनिरीक्षक बालाजी ढगारे यांनी त्याला सविस्तर घटना विचारली. त्यानंतर उपअधीक्षक जयदत्त भवर, सहायक निरीक्षक सुदाम शिरसाट यांना घटना कळवली. दोघेही तत्काळ पोलिस ठाण्यात दाखल झाले. कडुबा घटना सांगत होता, मात्र आम्हाला शहानिशा करण्यासाठी घटनास्थळी जाणे महत्त्वाचे होते. त्यामुळे आम्ही कडुबाला घेऊन तत्काळ गावात पाेहाेचलाे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आमच्यातील वाद संपतच नव्हते…
कडुबा यांचा लहान मुलगा शेतात पाेहाेचला तेव्हा आई बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्याने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मी गावात एवढे प्रस्थ तयार केले होते. तिला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आणले तरी आमचे वाद संपत नव्हते. हे सर्व सहन न झाल्याने मी तिला मारून टाकले, अशी कबुली कडुबाने अधिकाऱ्यांसमोर दिली.
वादामुळे आई-वडीलही वेगळे झाले
सुनीता या ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, कडुबा व त्यांच्यात सतत वाद हाेत हाेते. त्यामुळे कडुबा यांचे आई-वडील वेगळे राहू लागले. काही महिन्यांपूर्वी लग्न झालेला मोठा मुलगा व सूनदेखील वेगळे झाले. रविवारी सुनीता व कडुबा शेतात होते. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याने कडुबाने सुनीता यांना मारहाण सुरू केली. त्यामुळे त्या पळत सुटल्या. तेव्हा कडुबाने त्यांचा पाठलाग करून त्यांच्याच स्कार्फने गळा आवळून खून केला. त्यानंतर दोन वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यात हजर झाला.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४