अपघात l यावल पंचायत समितीच्या शासकीय गाडीला अपघात गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार

Spread the love

धरणगाव (प्रतिनिधी) यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज दिनांक 23 नोव्हेंबर 22 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शासकीय गाडीने यावल येथून नाशिक येथे शासकीय गाडी एम एच एकोणावीस डी व्ही 41 99 या गाडीने कामासाठी जात असताना अमळनेर तालुक्यातील बोहरा फाटा या ठिकाणी पावणे सहा वाजेच्या सुमारास गाडीला अपघात होऊन जागीच गतप्राण झाले तर गाडीवरील ड्रायव्हर ला किरकोळ दुखापत झाली असल्याची वृत्त हाती आले आहे

भरधाव वेगात असलेल्या गाडीने उभ्या ट्रकला ठोस दिल्याने एकनाथ चौधरी हे क्लीनर साईडला बसलेले होते त्या ठिकाणी गाडी ट्रकवर आढळल्या गेली त्यात ते जागीच गतप्राप झाले एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार सांभाळून यावल पंचायत समितीच्या प्रभारी कार्यभार सांभाळीत होते मीत भाषी व नेहमी कामाशी काम ही वृत्ती ठेवणारा एक चांगला अधिकारी अपघातातून निघून गेला

एक महिन्यातच यावल पंचायत समितीतील सर्व बहुतेक काम त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळलेली होती यावल येथेच त्यांना पंचायत समितीच्या कार्यभार मिळावा म्हणून यावल तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नामदार गिरीश महाजन यांच्याकडे मागणी करीत होते दरम्यान अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. तर, गटविकास अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी देखील अपघातस्थळ गाठले.

दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या घटनेची पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. एकनाथ चौधरी हे मूळचे चाळीसांव तालु्यातील तरवाडे येथील रहिवासी असून सध्या ते धुळे येथे राहतात सध्या अमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्याकडे यावल येथील गटविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील होता. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात धरणगाव तालुक्यातील भोणे जवळ पहाटे झाला असून एकनाथ चौधरी यांचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.

टीम झुंजार