जुन्नर : – सहा महिन्यापूर्वी विवाह झालेले दांपत्य विहिरीत पडून मृत्यूमुखी पडल्याची घटना आदिवासी भागातील कुकडेश्वर (ता. जुन्नर) येथे घडली. या घटनेत सागर बाळू दिवटे व नाजुका सागर दिवटे या नवदांपत्याचा मृत्यु झाला.
या संदर्भात घडलेला प्रकार असा, घराशेजारीच असलेल्या व काठोकाठ भरलेल्या विहिरीवर नाजुका कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी तोल जाऊन नाजुका पाय घसरून विहिरीत पडली. यावेळी सागरने पत्नी नाजुका हीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतल्याचे सांगण्यात येते. अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.
विहीरीकाठी गाणी सुरू असलेला मोबाईल व विहिरीत बादली पडल्याचे आढळले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सागरने नुकतेच कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले होते व तो शेतीची कामे करायचा. निर्व्यसनी आणि मनमिळावू असलेला सागर व नाजुका यांच्या आकस्मित मृत्यूमुळे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.
मोबाईलवर सुरू होते गाणे
पत्नीचा आवाज आल्याने पती सागर धावत येऊन पत्नी नाजुकाला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र पोहण्याचा सराव नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडुन दुदैवी मृत्यु झाला. विहिरीच्या काठावर गाणे सुरू असलेला मोबाइल व विहिरीत तरंगणारी बादली दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






