शिरपूर :- आदिवासी विकास विभाग धुळे प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा १८ व १९ नोव्हेंबर २०२२ रोजी इंदवे ता. साक्री येथे संपन्न झाल्या.
पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी ता.शिरपूर येथील खेळाडूंनी या स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक क्रिडा प्रकारात दमदार कामगिरी करत नाशिक येथे होणाऱ्या विभाग स्तरीय क्रीड़ा स्पर्धेसाठी १० खेळाडूंची झाली.
यात १७ वर्षे वयोगटातील मुलींचा कबड्डी संघात उषा दामज्या पावरा, योगिता बंडू पावरा, नीलिमा तुकाराम पावरा, जागृती तुकाराम पावरा, लोती कैलास पावरा खेळाडूंची निवड झाली.
१४ वर्षे वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघात आशा कैलास पावरा, संजना अमरसिंग पावरा या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
१४ वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघात बियाराम भाईदास पावरा, रितेश कुवरसिंग पावरा दुर्गेश पावरा या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
१४ वर्षे वयोगटातील मुलांच्या खो खो संघात रितेश कुवरसिंग पावरा या खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
वैयक्तिक क्रिडा प्रकार उंच उडीत
बियाराम भाईदास पावरा याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्तरावर निवड झाली.
बुद्धिबळ या वैयक्तिक क्रिडा प्रकारात मोगिता पाडवी या विद्यार्थीनीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला.
सांगवी आश्रमशाळेच्या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहासदादा नटावदकर व एकलव्य विद्यालयाच्या प्राचार्य सौ. सुहासिनी नटावदकर मॅडम यांनी कौतुक केले.
सांगवी आश्रमशाळेचे
श्री विठोबा हरचंद चौधरी (माध्यमिक मुख्याध्यापक)व श्री कल्पेश कांतीलाल मावची(प्राथमिक मुख्याध्यापक) यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा शिक्षक श्री सचिन लोटन नाथजोगी व संघव्यवस्थापिका श्रीमती मिनाक्षी पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आश्रम शाळा सांगवी यांनी परिश्रम घेतले.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






