मुंबई (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी अशोक सावरकर यांना विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय विचार परिषदेच्या वतीने लेखी निवेदने पाठवून करण्यात आली आहे.
सात्यकी सावरकर उच्चविद्याविभूषित असून सॉफ्टवेअर अभियंता आहेत. त्यांना स्वातंत्र्यवीरांचा वैचारिक वारसा असून हिमानी सावरकर यांचे ते सुपुत्र आहेत. अभिनव भारत चळवळ त्यांनी जवळून पाहिली आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्याचे केवळ अभ्यासक नाही तर वैचारिक पातळीवर त्यांचे विचार अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या साहित्याची धुरा स्नुषा हिमानी सावरकर यांच्यावर सोपविली आणि त्यांच्या पश्चात ही जबाबदारी सात्यकी यांच्यावर असून ते देशभरातील विविध संस्थांना साहित्य प्रकाशन निर्मितीत सहकार्य करत असतात.
स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांच्या सर्व गटांमधील संस्था, संघटनांशी त्यांचा एकोपा असून त्यांच्यात सात्यकी यांच्याबद्दल सकारात्मकता आहे. अशावेळी त्यांना विधानपरिषदेवर सदस्यत्व मिळाल्यास या सर्व सावरकर प्रेमींचे ते प्रतिनिधी ठरतील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. याबाबत सावरकरप्रेमी नागरिक व संस्थांचे प्रतिनिधी सात्यकी सावरकर यांची भेट घेऊन त्यांनादेखील यासाठी आग्रह करणार आहेत.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.