लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांनी केलेली अर्थपूर्ण आहे Democracy is the government of the people, by the people and for the people लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही होय. राजेशाही म्हणजे रक्त सांडून सत्ता परिवर्तन रक्ताचा एकही थेंब न सांडता सत्ता परिवर्तन म्हणजे लोकशाही.
संविधान सभेचे कार्य 2 वर्षे 11 महिने 17 दिवस चालले यातून भारतीय राज्यघटना ही विस्तृत 12हजार पानांची तयार झाली या कालावधीत संविधान सभेचे 11 सत्रे व 165 बैठका संपन्न झाल्यात संविधान निर्माण प्रक्रियेचे दर्शक दीर्घेतून सुमारे 53 हजार दर्शकांनी अवलोकन केले जगातील कोणत्याही राज्यघटनेपेक्षा भारताची राज्यघटना मोठी आहे सुरुवातीला राज्यघटनेत 22 प्रकरणे 395 कलमे आणि आठ परिशिष्टे होती आज भारतीय राज्यघटनेत 24 प्रकरणे 448 कलमी आणि बारा परिशिष्टे आहेत.
1946 च्या प्रांतिक निवडणुका नंतर त्यात निवडून आलेल्या प्रांतिक सदस्यांच्या मतदानातून संविधान सभेचे प्रतिनिधी निवडून संविधान सभा स्थापन करावी असे निश्चित झाले त्रिमंत्री कॅबिनेट मिशन 16 मार्च 1946 रोजी सत्ता हस्तांतरणाची योजना प्रसिद्ध केली आणि संविधान सभेचे कार्य सुरू करण्यात आले
17 डिसेंबर 1946 रोजी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर बाबासाहेब यांना ठरावावर बोलण्यास पाचारण केले त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर स्वतःचे प्रतिबिंब उमटविण्याची संधी न सोडता त्या भाषणाने आपल्या राजकीय जीवनाचा क्रमच बदलून टाकला डॉक्टर बाबासाहेबांनी देशाची उदात्त व महान परंपरा, सहिष्णुता, बंधुभाव, सर्वसमावेशकता, संयम व न्यायप्रियता या गुणांचा उल्लेख करून त्या महान परंपरेचा मनाच्या मोठेपणाचा आरसा आपण जगाला दाखवूया व आज सभागृहाबाहेर असणाऱ्या आपल्या रुसलेल्या देश बांधवांना बरोबर घेऊन सहमतीचा एक नवा आदर्श उभा करूया असे आवाहन करून सर्वांना चकित केले बर्फ चे वाक्य उदघृत करून बाबासाहेब म्हणतात सत्ता देणे घेणे सोपे असते पण शहाणपणा देणे महाकठीण असते या बाबासाहेबांच्या भाषणामुळे काँग्रेसच्या दृष्टिकोनात अमुलाग्र बदल झाला.
दुसऱ्या दिवशी सर्व भारतीय वृत्तपत्रांनी “अखंड हिंदुस्तानची घोषणा” या शीर्षकाखाली डॉक्टर बाबासाहेबांवर स्तुतीसुमने उधळली आचार्य अत्रे यांनी त्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात न लिहिण्याची शपथच घेतली विविध वृत्तपत्रांनी शेक्सपियरच्या ज्युलीयस सिझर या नाटकातील सिझरच्या वर्णनात बदल करून ‘आंबेडकर’ उभे राहिलेले त्यांनी पाहिले व जिंकले असे मार्मिक वर्णन केले. देशाच्या फाळणीतून सदस्यत्व रद्द झाले असताना सुद्धा त्यांच्या ज्ञानाचा बुद्धिमत्तेचा कर्तुत्वाचा राष्ट्र उभारण्यासाठी उपयोग झाला.
दरम्यान युरोपातील घटना तज्ञ आयर्लंडचे घटनाकार आयव्हर जेनिंग यांना घटना समितीवर तज्ञ म्हणून काम करण्याची विनंती केली होती तेव्हा त्यांनी ती विनंती नाकारली व भारताचा सुपुत्र ज्याला संविधान शास्त्रातील ज्ञानासाठी जगातील विद्वान मानतात त्या डॉक्टर बाबासाहेबांना आपण निमंत्रित करावे असा सल्ला दिला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे If democracy dies it will be own doom लोकशाही संपली तर सामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल लोकशाहीचा मृत्यू म्हणजे सामान्य माणसाचा मृत्यू.. ज्या काळात सामाजिक अधपतन झाले होते विषमता होती त्या काळात संविधान रुपी राजग्रंथ तयार झाला. आपण एखाद्या प्लॉटचे मालक असू हे आपण कशाने सिद्ध करू तर आपले करार रुपी खरेदी करत असते तर भारत हा देश आपला आहे आपण या देशाचे मालक आहोत याचा लेखी पुरावा म्हणजे आपले भारतीय संविधान..या संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते यात सर्व जाती धर्माचे विविध भाषा बोलणारे आणि विविध व्यवसाय करणारे अशा विविध प्रकारच्या लोकांचा समितीत समावेश होता.
भारतीय संविधानाचा अभ्यास करताना असे लक्षात येते की भारतीय संविधान हे दोन लोकांच्या बाजूने झुकलेले आहे एक म्हणजे लहान बालक आणि दुसरे म्हणजे स्त्रिया… कोणत्याही देशातील एकूण मनुष्यबळापैकी अर्धी संख्या स्त्रियांची असते भारतात स्त्रियांचा विकास झाला तरच कुटुंबाचा समाजाचा आणि देशाचा विकास होऊ शकतो हा विचार डॉक्टर बाबासाहेबांनी मांडला व त्यांनी स्त्रीशिक्षणास व स्त्रियांचा अधिकारांना प्राधान्य दिले इतकेच नव्हे तर स्त्रियांचे सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक गुलामीतून मुक्तता करण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले होते स्त्रियांची प्रगती म्हणजे राष्ट्राचे प्रगती होय असा विचार मांडून त्यांच्या उत्थानाकरीता त्यांनी विविध कायदे केले राज्यघटनेचा संपूर्ण अभ्यास केला तर राज्यघटनेत कुणाच्या हक्क अधिकाऱ्याला प्राधान्य देण्यात आले आहे तेव्हा असे लक्षात येते की राज्यघटनेत सर्वात जास्त झुकते माप महिलांना व बालकांना देण्यात आले आहे असे दिसते आपल्या भारतात पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या, राष्ट्रपती झाल्या, लोकसभा सभापती झाल्या, अमेरिका एक प्रगत राष्ट्र असून देखील त्या ठिकाणी आजपर्यंत महिला राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष झालेले नाही इंग्लंडमध्ये सहाशे वर्षापासून लोकशाही नांदत होती परंतु इंग्लंडमध्ये 1928 मध्ये महिलांना मताचा अधिकार मिळाला परंतु भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळाले आणि सर्व स्त्रियांना त्यावेळी पुरुषांप्रमाणेच मताधिकार मिळाला व 17-18 वर्षातच भारतात महिला पंतप्रधान झाली हे भारतीय संविधानाचे व्यापक स्वरूप समजते. समान पगार असो संपत्तीचा समान वाटा असो किंवा गर्भवती असताना सहा महिन्याचे पगारी रजा असो असे अनेक नाही अनेक हक्क महिलांना बाबासाहेबांमुळे मिळाले. कामगाराच्या 24 तासाचे काम 8 तासावर केले स्त्रियांना घटस्पोटाचा अधिकार दिला, पतीच्या मालमत्तेत अधिकार दिला..
जागतिक पातळीवरच्या राज्यघटनेचा विचार केला तर असे दिसते अमेरिकेची राज्यघटना बनवताना 4 महिने लागले, कॅनडाच्या घटनेला 2 वर्ष 5 महिने लागले, ऑस्ट्रेलियाच्या घटनेस 9 वर्ष लागली, दक्षिण आफ्रिकेची घटना पूर्ण होण्यास 1 वर्ष लागले. आपल्या घटनेत 395 कलमे आहेत तर अमेरिकेच्या घटनेत सातच कलमे आहेत, ऑस्ट्रेलियाच्या घटनेत 128 कलमे, कॅनडाच्या 147, दक्षिण आफ्रिकेच्या घटनेत 153 कलमे आहेत.
नेल्सन मंडेला म्हणतात भारताकडून घेण्यासारखी एकच गोष्ट आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान.. डॉक्टर बाबासाहेबांनी घटनाकार म्हणून केलेले कार्य सूर्याच्या प्रकाशापेक्षा कुठल्याच अर्थाने कमी लेखता येत नाही हे वास्तव सत्य आहे भारतीय संविधान हा भारताचा अधिकृत राष्ट्रीय ग्रंथ आहे ज्या ब्रिटनने आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केले त्या ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांनी विन्स्टन चर्चिल यांनी भारताची राज्यघटना वाचल्यावर उद्गार काढले होते की जर माझ्या देशात अराजकता मारली तर आम्हाला भारताची राज्यघटना आमच्या देशासाठी वापरायला अभिमान वाटेल..अमेरिकेचे जॉर्ज बुश आणि अल्गोर यांच्यामध्ये झालेल्या 2000 सालच्या अमेरिकन अध्यक्षाच्या निवडी वेळी घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला होता त्यावेळी अमेरिकेतील सर्व घटना तज्ञ यांना काही सूचत नव्हते जगातील कोणत्याही राज्यघटनेत अशा परिस्थितीत काय करावे याचे मार्गदर्शन नव्हते तेव्हा भारतीय संविधानात याची तरतूद मिळाली ती म्हणजे संसदेच्या सभापतींना समान मते पडल्यास आपले मत निर्णय मत एकाच्या पारड्यात टाकून हा पेज प्रसंग सोडवला पाहिजे तेव्हा अमेरिकन सभापतींनी बूथच्या पारड्यात मत टाकून जॉर्ज बुश यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले तसेच थायलंडच्या राजाने आपल्या देशाची (थायलंडची) राज्यघटना लिहीत असताना प्रेरणा, आधारस्तंभ, मार्गदर्शक म्हणून प्रथम भारतीय संविधान मागवून घेतले होते.
निवडणुका हे लोकशाहीने दिलेली अनमोल देणगी आहे प्रत्येकाला मताधिकार दिला आहे मग तो श्रीमंत असो गरिब असो,राजा असो रंक असो, प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार दिलेला आहे.आधी राजा आणि गुलाम ही व्यवस्था होती राजाच न्याय देत असे, अर्थव्यवस्था सांभाळत असे, संरक्षण व्यवस्था सांभाळात असे, लोकशाहीत मात्र मतदार राजा आहे. पूर्वी राजा हा महाराणीच्या पोटातून जन्माला येत असे पण आता संविधानामुळे मिळालेल्या प्रौढ मताधिकारामुळे मतदारांनी दिलेल्या मतपेटीतून राजा निर्माण होतो. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात संविधान कितीही सर्वश्रेष्ठ असू द्या परंतु राबवणारे हात वाईट असतील तर ते संविधान कुचकामी ठरते बाबासाहेब म्हणतात तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते मत विकत घेऊन पाहणाऱ्या इतके कंगाल कोणीच नसेल. सरदार पटेल म्हणतात आम्हाला संविधान कार्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सापडणे शक्य नव्हते आम्ही सर्वश्रेष्ठ व्यक्तीची निवड केली हे ऐतिहासिक वास्तव आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन तत्त्वावर चालणारा जीवनाचा मार्ग म्हणजे लोकशाही.. संविधान लिहून पूर्ण झाल्यावर एका पत्रकाराने पत्रकार परिषदेत बाबासाहेबांना प्रश्न विचारला की बाबासाहेब तुम्हाला संविधान लिहिताना काही अडचण येत होती का यावर बाबासाहेबांनी लगेच उत्तर दिले की मला संविधान लिहिताना जराही अडचण आली नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभे होते. संविधान व्यापक आहे, मानवतावादी आहे. बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाची प्रत राष्ट्रपतींना दिली बाबासाहेब त्यादिवशी खूप आनंदात होते, बाबासाहेबांचे स्वीकृत सहाय्यक नानकचंद्र रत्तू यांनी बाबासाहेबांना विचारले बाबासाहेब आज तुम्ही खूप आनंदात दिसत आहात त्यावेळी बाबासाहेब उत्तरले की मी या भारताला असे संविधान दिले आहे, रस्त्यावर फिरणारा माणूस खुर्चीवर येऊ शकतो आणि खुर्चीवर बसणारा माणूस रस्त्यावर येऊ शकतो.. म्हणून च एका कवीने म्हटले आहे
“मेरे भीम ने कलम उठाई इस देश का संविधान बन गया
इस संविधान की ताकद तो देखो, एक चाय बेचने वाला देश का पंतप्रधान बन गया”.
डॉक्टर बाबासाहेब म्हणतात भारताने यापूर्वी आपले स्वातंत्र्य गमावले होते ही आपल्याच माणसांच्या देशद्रोहामुळे. इतिहासातील देशद्रोहाचे दाखले देऊन बाबासाहेब जनतेला आवाहन करतात की मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याकरता शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत आपण झटले पाहिजे.. चला तर मग देशाचं, आपलं संविधान अबाधित ठेऊया..
जय संविधान जय भारत!
उगलाल शिंदे .
संपर्क 9284619960
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






