मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० मालिकेत न्यूझीलंडला २-० असं पराभूत केल्यानंतर आज भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानात उतरला. पण विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, धवन आणि गिल यांनी २३.१ षटकात १२४ धावा जोडून भारतासाठी प्लॅटफॉर्म तयार केला. मागच्या नऊ डावांमध्ये त्यांची ही चौथी शतकी भागीदारी ठरली. टीम साऊदीने धवनला बाद करत त्याच्या खात्यात २००व्या एकदिवसीय विकेटची नोंद केली. हे यश मिळवणारा न्यूझीलंडचा तो पाचवा गोलंदाज ठरला. श्रेयस अय्यर, शिखर धवन आणि शुभमन गिल यांच्या अर्धशतकांनी आणि वॉशिंग्टन सुंदरच्या कॅमिओने भारताला ३०६/७ धावसंख्येपर्यंत नेले. लॉकी फर्ग्युसन ३/५९ टिम साउथी ३/७३ यांनी गडी बाद केले.
अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनी या फॉरमॅटमध्ये पदार्पण केल्यामुळे भारत अननुभवी गोलंदाजांसह खेळत होता. सहाव्या गोलंदाजीचा पर्याय नसल्यामुळे, विशेषत: जेव्हा पाठलाग जवळ आला तेव्हा ते आणखी अडचणीत आले.टॉम लॅथम (१०४ चेंडूत १४५), विल्यमसन (९४) यांनी जबाबदारीने भागीदारी करत ४७.१ षटकांत भारताच्या ३०६/७ धावांचा पाठलाग करून ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. चौथ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी लॅथमने चौकार मारून केली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी १६५ चेंडूत २२१ धावांची भर घातली आणि न्यूझीलंडने भारताचा सात गडी आणि १७ चेंडू राखून पराभव केला. उमरान मलिक २/६६ शार्दुल ठाकूर १/६३ बळी घेतले.
शेवटच्या ११ षटकांत न्यूझीलंडला ९१ धावांची गरज होती आणि सात विकेट्स शिल्लक होत्या. दोन झटपट विकेट्स भारताने घेतल्या असत्या तर निकाल वेगळा लागू शकला असता, पण तेव्हाच लॅथमने निर्णायकपणे खेळ न्यूझीलंडकडे वळवला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले.घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा हा सलग १२वा एकदिवसीय विजय होता, घरच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांची ही सर्वात मोठी विजयी खेळी ठरली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडने भारतासमोर ३०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याची ही दुसरी वेळ आहे.
टॉम लॅथमला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मालिकेतला दुसरा सामना २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.