वालचंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कळंब येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
कळंब :- ‌( ता. इंदापूर )
ग्रामीण विकास प्रतिष्ठान कळंब संचलित वालचंद विद्यालय व कनिष्ठ विद्यालय कळंब या महाविद्यालयामध्ये 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे युवा संचालक प्रताप सिंह कदम तसेच विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब सर्वगोड ,पर्यवेक्षक माळवदकर सर ज्येष्ठ शिक्षक अर्जुन सर, सरपंच अतुल सावंत आणि या संविधान दिनानिमित्त प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा. कपिल कांबळे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब मराठी विभाग सहाय्यक प्राध्यापक हे उपस्थित होते.


सर्वप्रथम प्रज्ञा सूर्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका उद्देश पत्रिकेचे पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमादरम्यान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संविधान दिनाविषयी आपले मत व्यक्त केले .त्यामध्ये सानिया घोडके, प्रथमेश साबळे ,सोहम घाटे ,दिव्या कुंभार या विद्यार्थ्यांनी जोरदार भाषणे केली.
यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा. कपिल कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे ग्रंथ प्रेम या विषयावर मांडणी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये खूप अभ्यास केला विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून दिवस-रात्र एक करून आपल्या देशाला नवीन घटना दिली. भारतीय राज्यघटनेत तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज ,क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा विचार स्वीकारलेला दिसून येतो. असे मत त्यांनी व्यक्त केले.


या संविधान दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वगोड सर हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी संविधान म्हणजे नेमके काय संविधान सभेची निर्मिती प्रक्रिया सदस्य आणि संविधानाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. राऊत सर यांनी मानले व सूत्रसंचालन प्रा.काशीद सर यांनी केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार