प्रतिनिधी धरणगाव :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे संविधान दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम गावातून संविधान रॅली काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी अनेक घोषणा दिल्या.
त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील उपशिक्षक संजय गायकवाड व वैशाली वाणी यांनी केले. नंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन श्री.संजय गायकवाड यांनी केले त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी वाचन केले. तसेच संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.अशा प्रकारे विविध कार्यक्रमांनी संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






