संविधान गौरव दिनानिमित्त ‘संविधान जागर रॅली’ उत्साहात

Spread the love

संविधानामुळेच मी तळागाळातील एक कार्यकर्ता आज महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री : गुलाबराव पाटील

जळगाव :- संविधान जागर समितीच्या वतीने रेल्वे स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ २६ नोव्हेंबर हा संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करत संविधान गौरव दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी विचार मंचावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटिल, महापौर जयश्री महाजन, संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे, जिल्हा पोलिस अधिक्षक एम राजकुमार, महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ विद्या गायकवाड, एजाज मलिक, शंभू पाटिल, प्रतिभा शिंदे, डी डी बच्छाव, नगरसेवक सुरेश सोनवणे, सरिता माळी, सचिन धांडे, अमोल कोल्हे, राजू मोरे, मुकुंद नन्नवरे, गनी मेमन, संदिप ढंढोरे, शालिग्राम गायकवाड एरंडोल, मिलिंद पवार, रईस बागवान, दिलीप सपकाळे, महेंद्र , केदार, वाल्मिक सपकाळे, रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, भारती म्हस्के उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व मान्यवरांचे स्वागत संविधान जागर समितीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटिल यांनी भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले. उपस्थित सर्व स्त्री पुरुष यांना प्रस्ताविकेच्या प्रिंटेड लॅमीनेशन प्रति देण्यात आल्या होत्या . गुलाबराव पाटिल यांचे नंतर सर्व नागरिकांनि प्रस्ताविकेचे सामुहिकरीत्या वाचन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रितीलाल पवार यांनी केले. मनोगत व्यक्त करतांना ना. गुलाबराव पाटिल म्हणाले की, सनविधानामुळेच मी तळागाळातील एक कार्यकर्ता आज महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे. संविधानाचा अभिमान सर्व भारतीयांनी ठेवावा. मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी आपल्या घणाघाती भाषणात संविधानाचे महत्त्व विषद करतांना संविधानाचे संरक्षण व संवर्धन करण्याची आज नितांत आवश्यकता आहे आणि सर्व भारतीय नागरिकांनी संविधानाबाबत सदैव जागृत व सजग असावे असे आवाहन केले. तसेच प्रतिभा शिंदे, डॉ विद्या गायकवाड, शंभू सोनवणे, गनी मेमन, महापौर जयश्री महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संविधान जागर रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. सदर संविधान सदर संविधान जागर रॅलीत मोठया संख्येने स्त्री पुरुष उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाधान सोनवणे, बाबुराव वाघ, मिलिंद सोनवणे, सतिश गायकवाड, भारत सोनवणे, भानुदास गायकवाड, भानुदास विसावे, आकाश सपकाळे, दिलीप त्रंबक सपकाळे, सुभाष साळुंखे, जगदीश सपकाळे, भैय्या सुरवाडे, सचिन बिऱ्हाडे, भीमराव सोनवणे, निलू इंगळे, रंजीता तायडे, नितीन सोनवणे, भिकन सोनवणे, सुनील देहाडे, विजय सुरवाडे, नितीन मोरे, आनंदा तायडे, अजय गरुड, सचिन अडकमोल, दत्तू सोनवणे, नारायण सोनवणे, कृष्णा सपकाळे, यशवंत घोडेस्वार, जिवन बहारे, योगेश सोनवणे आदींनी परिश्रम घेत

हे वाचलंत का ?

टीम झुंजार