जळगाव : – सध्या महाराष्ट्रात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरात एक घटना घडली आहे अश्यातच ‘प्लीज एक फोन करू द्या ना’, असे म्हणत विद्यार्थिनीचा मोबाईल एका महिलेने घेतला. फोनवर बोलण्याचे नाटक करत मोबाईल घेऊन ही महिला दुचाकीस्वारासोबत बसून पसार झाली. ही घटना शनिवारी (ता. २६) सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवकॉलनी पेट्रोलपंपाजवळ घडली.
कबचौ विद्यापीठाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेली विद्यार्थिनी रेवती पावरा ही मु. जे. महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेअकराच्या सुमारास ती मु. जे. महाविद्यालयाकडून शिवकॉलनीकडे जात होती. शिवकॉलनीजवळील पेट्रोलपंपाजवळ तिला दुचाकीवरून आलेल्या पुरुष व महिलेने थांबविले.
प्लीज एक कॉल करू द्या ना तुमच्या मोबाईलवरून’, अन् ते फरार‘प्लीज एक कॉल करू द्या ना तुमच्या मोबाईलवरून’, असे सांगत तिच्याकडून मोबाईल मागितला. बोलत असल्याचे नाटक करून दुचाकीवरील पुरुष व महिला मोबाईल घेऊन फरारी झाले. नंतर विद्यार्थिनीने रामानंदनगर पोलिसांत तक्रार दिली.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.