पिंप्री खु येथे ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिवस उत्साहात ..

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी

धरणगाव :- पिंप्री खु येथील ग्रामपंचायत मध्ये संविधान अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला . या वेळी सरपंच सॊ सरला बडगुजर यांच्या शुभहस्ते भारतीय संविधान व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्य सुनील बडगुजर सर यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. संविधान दिनाचे औचित्य साधून मनोगत व्यक्त केले.

तसेच ग्रामपंचायत सदस्य डी बी मनुरे सर यांनी भारतीय संविधानाचा इतिहास, मूलभूत अधिकार व कर्तव्य याची विस्तृत माहिती दिली.

या वेळी 26 – 11 मुंबईतील आतंकवादी हल्ल्यात निरपराध भारतीय नागरीक व पोलिस ऑफिसर यांना वीरमरण आले. या सर्वांनी आपल्या जीवाची परवा न करता देशाचे संरक्षण केले. सर्व वीर जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. प्रसंगी या वेळी भारत मुक्ती मोर्चा चे प्रदेश महासचिव मोहन शिंदे यांनी संविधानाचे महत्त्व सांगून संविधानावर चालण्याचा प्रयत्न करा. संविधान आपला आत्मा आहे असे प्रतिपादन केले.

या वेळी ग्रामसेवक सुनील बोरसे , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बडगुजर , मंगल आणा पाटील , सरला लोखंडे , शांताराम सोनवणे , कमलाबाई धोबी , अनुसया सोनवणे , छाया मोहकार , तसेच रमेश दोडे , देविदास चौधरी , गौतम दोडे , कृष्णा मोरे , बंटी बीजबीरे ,जयराम बीजबीरे ,सिराज कुरेशी ,भागवत बीजबीरे , आशिष सपकाळे , दीपक कुराडे , अरबाज कुरेशी , राजू बीजबीरे , तसेच ग्रामपंचायत कर्मचारी निलेश बडगुजर , तुषार मोहकर , सुभाष सोनवणे ,गंगाराम पवार आदी उपस्थित होते

हे वाचलंत का ?

टीम झुंजार