राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेले पिर नथू बापू यांच्या उर्स ला आज पासून सुरुवात,भव्य कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

एरंडोल: शहरातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक पिर नथू बापू मिया व यांचे दिनांक 29 नोव्हेंबर पासून ऊस ला सुरुवात होत आहे या निमित्ताने कुस्ती व कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक पीर नथू बापू मिया व पीर पठ्ठे वाली मिया यांचे उर्फ २९ नोव्हेंबर पासून सुरू होत असून २९ नोव्हेंबर मंगळवार रोजी संदल १ डिसेंबर २०२२ गुरुवार रोजी रोजी महादेव मंदिरा जवळ दुपारी तिन वाजता कुस्त्या, २ नोव्हेंबर २०२२ शुक्रवार फकीर मस्जिद समोर कव्वालीचे कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजेपासून आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने पंच कमिटी तर्फे ऊस ची तयारी सुरू आहे .

वेगवेगळ्या खेळणे झोके मौत का कुवा, दुकानदारांचे ऊर्सच्या ठिकाणी आगमन झाले आहे. ऊर्फ कमिटी कमिटीचे अध्यक्ष रमेश परदेशी उपाध्यक्ष गुलाम हुसेन बागवान सचिव जावेद मुजावर जॉईंट सेक्रेटरी जाहिरोदीन शेख कासम, रवींद्र शांताराम महाजन, खजिनदार अशोक सुखदेव चौधरी,नुरोदीन शेख महेमुद,सुभाष माधव पाटील,इस्माईल शेख हाषम, एकबाल लुकमान पिंजारी ,सुनील नारायण चौधरी, शेनपडू पुंडलिक वाल्डे, परवेज मुजावर ,कृष्णा महाजन, सलीम शेख वजीर ही पंच कमिटी काम पहात आहे.
दिनांक 29 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या विविध कार्यक्रमाला नागरिक बंधू भगिनींनी कार्यक्रमां चा लाभ घ्यावा व सदरचे उरूस शांतते साजरे करण्यात साठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष रमेश मुकुंदसिंग परदेशी व सचिव जावेद मुजावर यांनी केले .

एरंडोल पोलीस स्टेशनला ऊस निमित्त मीटिंग
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पंच कमिटीचे अध्यक्ष रमेश परदेशी,सचिव जावेद मुजावर,जॉईंट सेक्रेटरी जाहिरोदीन शेख कासम, खजिनदार अशोक सुखदेव चौधरी,सदस्य नुरोदीन शेख महमूद,सुनील नारायण चौधरी,सुभाष माधव पाटील,सलीम शेख वजीर,परवेज मुजावर,शालिग्राम गायकवाड ,अमीन मुजावर या पंचकमिटी सह बैठक घेण्यात आली यात उसाचे नियोजन व विविध कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात माहिती घेण्यात आली सदर बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद कुमावत, अनिल पाटील, सुनील लोहार अखिल मुजावर हे हजर होते

टीम झुंजार