एरंडोल: दरवर्षीप्रमाणे यंदाही एरंडोल येथे संविधान उत्सव समिती एरंडोल तर्फे संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून भारतीय संविधान उद्देशिका प्रतीचे सामूहिक शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.भारतीय संविधानाची उद्देशिका जर आपण सर्वांनी अंगीकृत केली, तरच खऱ्या पद्धतीने भारतीय संविधान हे घरा-घरात पोहोचेल असे मत एरंडोल न्यायाधीश श्रीमती.भक्ती तळेकर यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर भारतीय संविधान टिकवणे ही सर्वस्वी जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांची आहे. प्रखरपणे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे सर यांनी केले.
त्याचबरोबर एडवोकेट डी.बी.महाजन,एडवोकेट विलास मोरे , ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजी अहिरराव सर महेशकुमार ढकोलीया या मान्यवरांनी संविधानाविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एरंडोल न्यायाधीश श्रीमती भक्ती तळेकर प्रमुख पाहुणे एरंडोल तहसीलदार श्री मती सुचिता चव्हाण कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुमित्र अहिरे सर , तसेच अ.भा. श्री वा. नवयुवक संघ पदाधिकारी मा.महेश कुमार ढकोलिया (राष्ट्रीय अध्यक्ष) मा.राजेंद्र बागडे (प्रदेश अध्यक्ष)मा. सुरेंद्र मेहरोली (प्रदेश कार्यकारी अध्यक्ष) मा.कालीचरण बेद (प्रदेश उपाध्यक्ष), मा.भगतसिंग चावरिया(जिल्हा अध्यक्ष) मा.लाखन चांगरे , मा.विष्णू जावडेकर
मा.प्रकाश शिरसे, मा.मनोज सौंदे, मा.विजय कंडारे मा.राजेश बेद, मा.फकीरा कोकरे त्याचबरोबर सेवानिवृत्त मुख्याध्यापक उषाकिरण खैरनार, मौर्यक्रांती जिल्हाध्यक्ष रवींद्र लाडगे, सामाजिक कार्यकर्ते शालिकभाऊ गायकवाड, विजयअण्णा महाजन, आनंद दाभाडे, युवाउद्योजक राहुल तिवारी, मा.शिवाशी वाल्डे खानदेश रक्षक ग्रुपचे अध्यक्ष गणेश शिंदे व सहकारी , तसेच ज्येष्ठपत्रकार कमरअली सय्यद, पत्रकार संजय चौधरी व उपस्थित समस्त प्राध्यापक शिक्षक वृंद , तसेच मोठ्या संख्येने शहरातील नागरिक देखील उपस्थित होते. यावेळी भारत मातेचे सेवा बजावणारे सेवानिवृत्त व नवनियुक्त सैनिकांचा सन्मान सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन खोकरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नरेंद्र गायकवाड व मोहन चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक मा.सुनील खोकरे (महाराष्ट्र राज्य उपविभागीय अनु. जाती जमाती अन्याय अत्याचार दक्षता नियंत्रण समिती सदस्य), सचिव मा.देवानंद बेहेरे, (महाराष्ट्र राज्य उपविभागीय अनु. जाती जमाती अन्याय अत्याचार दक्षता नियंत्रण समिती सदस्य,) सहसचिव मा.प्रवीण बाविस्कर (महाराष्ट्र राज्य उपविभागीय अनु. जाती जमाती अन्याय अत्याचार दक्षता नियंत्रण समिती सदस्य.) कार्यक्रमाचे आयोजक – मनोज खोकरे,संतोष खोकरे,आरोग्यदूत विकी खोकरे, धरम खोकरे, जितेंद्र बोडरे ,नितीन खोकरे ,मोहित सोनार, रितिक खोकरे ,चंदन जाधव ,रोहित चावरिया ,सागर बोरसे, गौरव जाधव, चिन्मय जाधव ,आदी. संविधान उत्सव समिती एरंडोल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. व कार्यक्रमाचा समारोह राष्ट्रगीताने करण्यात आला.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






