शकुंतला विद्यालयात महात्मा फुलेंच्या स्मृतीस अभिवादन…

Spread the love

खऱ्या अर्थाने बहुजनांचे उध्दारक महात्मा फुलेच — लक्ष्मणराव पाटील

जळगांव : – येथील माऊली द्वारकाधीश फौंडेशन संचलित शकुंतला माध्यमिक विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचे प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना ए.ए.सुरवळकर सरांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून मान्यवरांचा परिचय करून दिला. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना तात्यासाहेब आणि माईंचे कार्य किती त्याग – समर्पणाचे होते याबद्दल विस्तृतपणे माहिती दिली. कार्यक्रमात विद्यार्थी – विद्यार्थिनींचा बोलका प्रतिसाद स्फूर्ती देणारा ठरला. शिवजयंतीचे जनक, शिक्षणक्रांतीचे जनक, इतिहास संशोधक, शेतकऱ्यांचे कैवारी, विचारवंत लेखक, बाबासाहेबांचे गुरू असलेले क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनाच बहुजनांचे उध्दारक म्हटलं पाहिजे असे प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांनी आपल्या मनोगतातून व्याख्यानाची भरभरून स्तुती केली. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सेवानिवृत्त शिक्षक पी.एस.नारखेडे यांनी देखील आपले अनुभवपर मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन माऊली द्वारकाधीश फौंडेशन जळगांव यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला माऊली द्वारकाधीश फौंडेशन चे अध्यक्ष विनोद हरी वाघ, सचिव योगेश सुतार, उपाध्यक्ष स्वप्नील भावसार, सदस्य सुरेश राजपूत, रुपाली सुतार, विजय पाटील, योगेश वराडे, हेमंत नारखेडे, सुनीता मिस्तरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका राजश्री नरेंद्र महाजन होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यु.के.भोळे, प.स.नेहते यांच्यासह शकुंतला विद्यालयाचे शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.ए.सुरवळकर सरांनी तर आभार प्रदर्शन पी.एस.चौधरी मॅम यांनी केले. कार्यक्रमाला इ. ५ वी ते १० वी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार