जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
चांगली मन:शांती लाभेल. नवीन नोकरीसाठी विचारणा होईल. सारासार विचार आणि सकारात्मकता ठेवा. कामे सुलभतेने पार पडतील. आपले ध्येय गाठण्यासाठी हर संभव प्रयत्न करा.
वृषभ :-
जोडीदाराच्या मताचा विचार करावा. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. व्यापारा निमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील. नवीन मित्रांशी संवाद वाढेल. फसवणुकीपासून सावध राहावे.
मिथुन :-
नातेवाईकांशी संबंध सुधारतील. धाकट्या भावंडांना मदत कराल. दिवस मध्यम फलदायी. अपेक्षित कमाईची कामना मनात बाळगाल. मनातील विचारांना आळा घालावा लागेल.
कर्क :-
पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. जोडीदाराविषयी नाराजी चटकन दर्शवू नका. जवळचे मित्र भेटतील. गप्पांचे फड जमवाल. क्षुल्लक मतभेद होण्याची शक्यता.
सिंह :-
कामात नवीन अधिकार हाती येतील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. भावंडांच्या सहवासात रमून जाल. जवळच्या ठिकाणी भेट द्याल. छंद जोपासायला वेळ काढाल.
कन्या :-
अतिरिक्त पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करावी. आपल्याकडून दानधर्म केला जाईल. घरातील वातावरण आनंदी व खेळकर राहील. आपले विचार खुलेपणाने मांडाल. गायन कलेला चांगला वाव मिळेल.
तूळ :-
घरासाठी पैसे खर्च कराल. मनात योजलेले काम पूर्ण कराल. समस्यांचे निराकरण होऊ शकेल. नव्या संधीमुळे मनावरील ताण कमी होईल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल.
वृश्चिक :-
द्विधा मन:स्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. दिवस धावपळीत जाईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल.
धनू :-
जोडीदाराकडून कौतुक केले जाईल. समोरच्या व्यक्तिला शब्द देताना सावध रहा. संमिश्र घटना जाणवू शकतात. झोपेची तक्रार जाणवू शकते. जुने मित्र भेटतील.
मकर :-
दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरासंबंधी कामात कौटुंबिक सदस्यांची मते विचारात घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. जोडीदाराची साथ व सहकार्य लाभेल. अनिश्चिततेचे मळभ दूर होईल.
कुंभ :-
मोठ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. समोरच्या व्यक्तिला विश्वासात घेऊन काम करा. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. मिळालेल्या संधीचे सोने करावे. बोलतांना भान हरवू नका.
मीन :-
अनेक दिवस अडून राहिलेले काम पूर्ण होईल. समोरच्यावर संपूर्ण विश्वास टाकू नका. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना लाभाचा दिवस. अचानक धनलाभ संभवतो. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






