मोठी बातमी ! घरकूल घोटाळ्याप्रकरणात सुरेश जैन यांना अखेर १० वर्षांनंतर जामीन मंजूर

Spread the love

जळगाव :- शिवसेनेचे नेते व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी नियमित जामीन मंजूर झाला आहे. तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल घोटाळ्यात 10 मार्च 2012 मध्ये सुरेशदादांना अटक झाली होती.

राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्याप्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई खंडपीठाचा मोठा दिलासा मिळाला आहे. खंडपीठाने सुरेश जैन यांचा आज अखेर जामीन मंजूर केला आहे. सुरेशदादा जैन यांना जामीन मिळताच दादा प्रेमी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जळगावात जल्लोष करण्यात आला.

घरकूल घोटाळा प्रकरणी सुरेशदादा जैन यांच्यासह इतरांना ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

तथापि, प्रमुख संशयित सुरेशदादा जैन यांना दिलासा मिळाला नव्हता.माजी सुरेशदादा जैन यांच्या जामिनासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले तरीही त्यांना जामीन मिळालेला नव्हता. २०१९ मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव जैन यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, आज सुरेशदादा जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. जैन यांच्या निकटवर्तीयांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार