२५ डिसेंबर, २०२२ रोजी जळगाव येथे होणार पुरस्काराचे वितरण
धरणगांव प्रतिनिधी –
धरणगांव : येथील गुड शेफर्ड अकॅडमी स्कूलचे उपशिक्षक, शिवव्याख्याते लक्ष्मण पाटील यांची सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र समता शिक्षक परिषद यांच्यातर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनी ” जिल्हास्तरीय सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार ” जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट यांनी सदर पुरस्काराची घोषणा केली आहे.
पुरस्काराचे वितरण जळगाव येथे २५ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री.पाटील यांचे मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुक होत आहे. याबाबत लक्ष्मण पाटील म्हणाले की, पुरस्काराने ऊर्जा मिळते. शिक्षणाचे आद्य जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनी मला “सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला याचा मला मनस्वी आनंद आहे. शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर विचार मनामनात आहे आणि ते सामान्यांपर्यंत पोहोचवीत आहोत. माझ्या शैक्षणिक सामाजिक कार्याची पावती आहे असे प्रतिपादन श्री.पाटील यांनी केले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






