पाचोरा : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एक खुन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात गाय घुसल्याच्या कारणावरून सख्खा काकाने आणि त्यांच्या मुलाने पुतण्याचा लाठ्या – काठ्यांनी मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना वाडी ता. पाचोरा येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, आरोपींना अटक करण्यास विलंब होत असल्याने गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या घरावर दगडफेक केली.
पूनमचंद भाऊराव पाटील (४९, रा. वाडी ता. पाचोरा) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. त्यांच्या मालकीची गाय त्यांच्याच शेतात चरत होती. त्याचवेळी ही गाय काका प्रल्हाद मोतीराम पाटील (६१) यांच्या शेतात घुसली. त्याचा राग येऊन प्रल्हाद व त्याचा मुलगा गणेश प्रल्हाद पाटील (४५) या दोघांनी पूनमचंदच्या मुलास मारहाण केली. मुलास मारहाण झाल्याचे कळताच पूनमचंद शेतात आला. यानंतर काका पुतण्यात वाद झाला.
प्रल्हाद व गणेश या दोघांनी पूनमचंदला पत्नी व मुलासमोरच लाठ्या- काठ्यांनी डोक्यात वार करीत गंभीर जखमी केले. जखमी पूनमचंद यास शेजारील शेतकऱ्यांनी तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. यावरून पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम