एरंडोल : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच शेतातील मक्याचा चारा आणण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर पलटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ट्रॅक्टर ट्रॉलीत बसलेल्या चार तरुणांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारात घडली आहे. योगेश ज्ञानेश्वर सैंदाणे (वय-२०, रा. अंबे ता. शिरपूर, जि. धुळे) असं मृत तरूणाचं नाव आहे. या अपघातात इतर तीन तरुण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती शी की, योगेश सैंदाणे हा एरंडोल तालुक्यातील नागदुली येथे मामाच्या गावी कामानिमित्त आला होता. बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी योगेश सैंदाणे हा नागदुली गावातील रविंद्र अभिमन कोळी यांच्या शेतातील मक्याचा चारा भरण्यासाठी उदेश गोविंदा कोळी, खुशाल राजू माळी यांच्यासोबत ट्रॅक्टर (एमएच १९ डीव्ही २६७१) ने सकाळी १० वाजता जात होता. त्यावेळी ट्रॅक्टर रविंद्र कोळी चालवत होते, तर अन्य चार जण ट्रॉलीत बसले होते.
सुकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅक्टर चालक रविंद्र कोळी यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट पाटचारीत पलटी झाला. या अपघातात योगेश सैंदाणे हा ट्रॅक्टरच्या खाली दाबला गेला. त्याला तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. तर ट्रॅक्टर चालक रविंद्र कोळी, उदेश कोळी, खुशाल माळी हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






