खासदार उन्मेश दादा यांच्या प्रयत्नातून टोळी शिवारातील शेतकऱ्यांना मिळाली नविन डी.पी.

Spread the love

टोळी ता. एरंडोल — गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या डिपीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील एम एस ई बी च्या अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. लाईट बिल भरून देखील नविन डी पी. मिळत नसल्याने पीके जळण्याची वेळ आली. एकीकडे विहिरीत भरपूर पाणी तर दुसरीकडे विज नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यांनी ही समस्या एरंडोल भाजप अध्यक्ष निलेश परदेशी यांच्या कडे मांडली.

आपण खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या कडे आमची समस्या मांडावी. त्या अनुषंगाने खासदार उन्मेश दादा यांनी संबधीत अधिकाऱ्यांना सूचना देत तातडीनं डी पी बसवावी अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन आपल्या कार्यालयात घेऊन येतो असा इशारा दिल्याने दोनच दिवसात डी पि बसविण्यात आली. यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक करीत आभार व्यक्त केले आहे.

आज टोळी शिवारातील नवीन वकील डी पी ( रोहित्र )बसविण्यात आले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष नितीन नाना महाजन,गोरख पाटील. मनोज पाटील. दिलीप नागो पाटील. युवराज नारायण पाटील. भगवान दत्तात्रय पाटिल. सुनील नारायण पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार