प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर यांचे विविध विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत विविध विषयावर आयोजित स्पर्धा परीक्षा वर मार्गदर्शन केले.

Spread the love


पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले


महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करिअर कट्टा या कार्यक्रमात प्रा. राजेंद्र चिंचोले यांचे दिनांक 22 जानेवारी 2022रोजी स्पर्धा परीक्षा सारथी भाग एक व 23 जानेवारी 2022 रोजी स्पर्धा परीक्षा सारथी भाग 2 या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वेबिनार झाले. सदर वेबिनार ला महाराष्ट्रातील सुमारे पाच हजार विद्यार्थी उपस्थित होते .या कार्यक्रमाची संकल्पना महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा .श्री.उदय सामंत यांची आहे.


प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी दोन सत्रांमध्ये आयोजित मार्गदर्शन शिबिरात केंद्रीय पातळीवरील केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा , संरक्षण दलाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, अर्धसैनिक दलाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धा परीक्षा, बँकेद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा,रेल्वेद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ,तसेच राज्य पातळीवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षा ,निवड समितीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती यावर सखोल माहिती दिली .विविध स्पर्धा परीक्षांची पात्रता ,परीक्षेसाठीचे निकष ,परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, विविध पदांची ओळख, पदांची कार्यपद्धती यावर प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी सखोल मार्गदर्शन केले आणि आपल्या आवडीनुसार, क्षमतेनुसार स्पर्धा परीक्षा द्वारे उत्तम ,रचनात्मक , सर्वोच्च सृजनशील, दैदिप्यमान करिअरचे यशोशिखर गाठावे .


स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सातत्याने कष्ट करण्याची तयारी हवी.अपयशाला धाडसाने समोर जाण्याची आणि त्यावर मात करण्याची तयारी हवी. स्वतःवर विश्वास ठेवून या परीक्षा द्याव्यात. स्पर्धा परीक्षा हे साधन असून अधिकारी बनून देशाची सेवा करणे हे साध्य आहे. स्पर्धा परीक्षेत परिश्रम ,सूत्रबद्ध ,शिस्तबद्ध ,सातत्यपूर्ण व नियोजनपूर्वक अभ्यास यशाची गुरुकिल्ली आहे .आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. यासाठी प्रयत्न करावे. जर स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने करिअर करावे असे प्रतिपादन प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे प्रा.राजेंद्र चिंचोले सर यांनी सखोल मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.यशवंत शितोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मेंडटके मॅडम यांनी केले.

टीम झुंजार