निंभोरा येथे दिव्यांग दिनानिमित्त सत्कार व दिव्यांग वाचनालयाचे भूमिपूजन

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे


निंभोरा बु: ता: रावेर
येथे दि. ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात आला तसेच दिव्यांग बांधवांकडता आठवडे बाजार चौकात दिव्यांग वाचनालय इमारतीचे भूमिपूजन ज्येष्ठ दिव्यांग बांधव गंगाराम कोळी तसेच सरपंच सचिन महाले यांच्या हस्ते कार्यक्रम दीप प्रज्वलन करून करण्यात आला.


यावेळी निंभोरा ग्रामपंचायतच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांचा ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी बहाटे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देत करण्यात आले.


याप्रसंगी ग्राम विकास अधिकारी गणेश पाटील,सरपंच सचिन महाले तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य व प्रामुख्याने राजू चौधरी. गंगाराम कोळी ,सुरेश बोरसे,सागर चौधरी, शामकांत बिडकर ,सचिन पाटील, गणेश खाचणे,अमोल तायडे, दिनेश कोंडे, प्रभाकर चौधरी, सुनील कोंडे मधूकर महाले, धनराज कोळी ,दिव्यांग बांधव उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार