शिर्डी प्रतिनीधी)
शिर्डी शहरातील साईबाबा संस्थानच्या हाॅस्पिटल जवळुन १८ डिसेबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास लावलेली हिरो होंडा कंपनीची १०हजार रुपये किंमतीची एम.एच.१७ ए. बी. ६१५४ हि दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक चितामणी काशिनाथ वाबळे वय ३२ राहणार रुई. ता. राहाता यांनी शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे शिर्डी पोलिसांनी भा.द.वी ३७९अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलिस करीत आहे शिर्डी शहराच्या साईबाबा संस्थानच्या हाॅस्पीटल परीसरातुन मोठ्या प्रमाणावर या अगोदर देखील मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीला गेल्या आहेत त्यास ग्रामीण भाग देखील अपवाद नाही शिर्डी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीला जात असल्यामुळे या दुचाकी चोरणाऱ्या टोळीला गजाआड करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले असुन ज्या ठिकाणावरून या दुचाकी चोरीला जातात त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पार्किंगसाठी साईबाबा संस्थानची मोठ्या प्रमाणावर जागा देखील उपलब्ध आहे मात्र या विषयावर साईबाबा संस्थानचे अधिकारी गंभीरपणे बघत नसल्याने दुचाकी चोरांचे पथ्यावर पडत असुन या जागेवर सी.सी
टी.व्ही बसल्यास व पेड पार्कींग केल्यास दुचाकी चोरीला जाणार नाही यासाठी शिर्डी पोलिसांनी देखील यासाठी साईबाबा संस्थान ने उपाययोजना करण्याबाबत पत्रव्यवहार देखील केलेला आहे साईबाबा संस्थान ने कामगार सोसायटी असलेल्या साई एम्पलाईज सोसायटीला प्रसाद विक्रीसह विविध साहित्य विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत या दुचाकी पार्कीगचे टेंडर देखील या संस्थेला दिले तर लोकांची व रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईक लोकांची वाहणे चोरी जाणार नाही लोकांना आर्थिक व मानसिक त्रासातुन सहजपणे सुटका होऊ शकते मात्र या जागेत फार काही उत्पन्न मिळणार नाही यामुळे हि सोसायटी देखील फार काही दक्षता घेण्यासाठी उत्सुक दिसुन येत नसल्याने या दुचाकी चोराच्या पथ्यावर पडत असल्याने आता या गंभीर प्रश्नावर साईबाबा संस्थान चे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
हा तर रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकावर अन्याय
विशाल कोळगे
साईबाबा संस्थान दवाखान्याच्या परीसरातुन अनेक वर्षांपासून दुचाकी चोरीला जातात सहसा टोळी पोलीसांना गजाआड करता आली नाही असे असले तरी साईबाबा संस्थान या गंभीर प्रश्नावर का उपाययोजना करत नाही हा संशोधनाचा प्रश्न असुन लवकरच कारवाई झाली नाही व उपाययोजना झाल्या नाही तर थेट साईबाबा संस्थान चे अध्यक्ष आशुतोष काळे यांना साकडे घालणार आहे
विशाल कोळगे वंचित बहुजन आघाडी उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष