श्री निलेश पाटील उपशिक्षक यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले /क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगांव : दि. ४ डिसेंबर, २०२२ रोजी जळगांव येथील अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानफळ तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथील आदर्श शिक्षक श्री निलेश शिवाजी पाटील यांना २०२२, ह्या वर्षाचा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (प्रोटान) जळगाव जिल्हा शिक्षक संघटनेकडून जिल्हास्तरीय सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले/क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन मा. श्री ए आर शेख साहेब (उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव) व मा. श्री जे डी पाटील साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिक्षण विभाग एरंडोल )यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम सोहळ्याचे प्रास्ताविक आनंद जाधव यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन उपशिक्षणधिकारी ए.आर.शेख यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण ३३ पुरस्कारार्थी आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच प्रमुख अतिथी माध्यमिक चे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्राथमिक चे शिक्षणाधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे अमळनेर, विजय पवार जळगांव, विकास भोई चाळीसगाव, राजेंद्र महाजन एरंडोल, नईम शेख यावल, रविकिरण बिऱ्हाडे धरणगाव, भास्कर लहासे बोदवड, सचिन परदेशी भडगाव, जे.डी.पाटील होते. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, ग्रंथ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख वक्ते प्रोटॉन शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद भालेराव यांनी शिक्षकांच्या समस्येबाबत प्रोटॉन संघटना कायम सोबत राहील असे मनोगत व्यक्त केले.


जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील अल्पबचत भवन येथे श्रीनिलेश पाटील यांची शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन बामसेफचे राज्य कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे, कार्याध्यक्ष मुबारक शहा, कोषाध्यक्ष मिलींद निकम, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, आर.बी.परदेशी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, व्याख्याते लक्ष्मणराव पाटील, प्रोटॉनचे सुनील देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


श्री निलेश पाटील यांना आत्तापर्यंत विविध सामाजिक संघटनांचे राज्यस्तरीय ,३ विभाग स्तरीय, २ जिल्हास्तरीय, २ पुरस्कार त्याचबरोबर राज्यस्तरीय विभाग स्तरीय व जिल्हास्तरीय निबंध लेखनाचे ४० हुन अधिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आजवर मिळालेली आहेतअसे तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनी आजचा हा जिल्हास्तरीय सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले /क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. हीच माझ्या सामाजिक – शैक्षणिक कार्याची पावती आहे. पुरस्काराने प्रेरणा व ऊर्जा मिळते असे प्रतिपादन श्री निलेश पाटील यांनी केले. याप्रसंगी पाटील यांचे सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक क्षेत्रातील मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
सूत्रसंचलन मुबारक शहा यांनी तर आभार यशराज निकम यांनी मानले. अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीतेसाठी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार