लोणार :- नेपाळ ( पोखरा स्टेडियम) येथे आंतरराष्ट्रीय १०० मिटर रनिंग स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेतील १०० मीटर धावण्याच्या क्रीडा प्रकारात हिरडवचा मंगेश पोफळे यांनी ४ देशातुन प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळालं आहे. त्याने १०० मिटर अंतर 10.98 सेकंदात पार केलं.या स्पर्धेत चार देशातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतासह नेपाल, चायना, भुतान आदी देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत लोणार तालुक्यातील हिरडव येथील मंगेश अरुण पोफळे याने भारताचे प्रतिनिधीत्व करत पहिला क्रमांक पटकावला असून त्याला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या मंगेशने हिरडव गावासह लोणार तालुका आणि बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकीक वाढविला आहे.
हे वाचलंत का ?
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






