एरंडोल-विरोधक खोटे आणि दिशाहीन आरोप करून नागरिकांची दिशाभूल करीत असून विरोधकांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करून विविध विकासकामांच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.राष्ट्रीय महामार्ग ते अंजनी प्रकल्प रस्ता आणि धरणगाव चौफुली ते धरणगाव रस्त्याच्या रुंदीकरण कामाच्या शिभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांना आक्रमकशैलीत टीका केली.विरोधक खोटे आणि चुकीचे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मात्र विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून त्यांना मतदारसंघात विविध विकासकामांच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.विरोधकांनी केलेल्या आरोपांना नागरिक बळी पडणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.सद्यस्थितीत मतदार संघात करोडो रुपयांची विकास कामे सुरु असल्यामुळे विरोधक हतबल झाले असल्याचे सांगितले.आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे मतदारसंघातील कामांसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी दोन्ही रस्त्यांचे भूमिपूजन आमदार चिमणराव पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग ते अंजनी प्रकल्प या रस्त्यामुळे शेतक-यांची पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर होणार आहे. तसेच धरणगाव चौफुली ते धरणगाव हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.अरुंद रस्त्यामुळे यापूर्वी रस्त्यावर अपघात होऊन निरपराध नागरिकांचे बळी गेले होते.या रस्त्यावर दररोज सकाळ आणि सायंकाळी शेकडो नागरिक पायी फिरण्यासाठी जात असतात.मात्र रस्ता अरुंद असल्यामुळे पायी जाणा-या नागरिकाना मोठी अडचण निर्माण होत होती.या परिसरात अनेक नवीन वसाहती असल्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी रहिवाशांनी केली होती.
आमदार चिमणराव पाटील यांनी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून रस्त्याच्या कामासाठी अल्पकाळात निधी मंजूर करून आणला होता.रस्त्याचे काम सुरु झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहेकार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, पारोळा शेतकी संघाचे माजी अध्यक्ष चतुर पाटील,पोपट राठोड,धनश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक राहुल तिवारी, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, चिंतामण पाटील,मयूर महाजन,गोविंदा बिर्ला,शास्त्री फार्मसी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.विजय शास्त्री,लोटन पटवारी यांचेसह नागरिक व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






