राजीव गांधी माध्यमिक विद्यालयात किशोरी मेळाव्यात डॉ स्नेहल बैसानेंचे मार्गदर्शन

Spread the love


धुळे :- राजीव गांधी माध्यमिक विद्यालय अनमोल नगर देवपूर धुळे येथे आज दिनांक 5 डिसेंबर रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान अंतर्गत किशोरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बापूसाहेब संजय एल.पवार सर होते.कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका तथा अतिथी धुळे मनपाच्या मेडिकल ऑफिसर डॉ .स्नेहल बैसाने होत्या. तसेच आरोग्य सेविका श्रीमती रोहिणी चव्हाण मॅडम व आशा वर्कर श्रीमती वैशाली पाटील मॅडम उपस्थित होत्या.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यातआला..उपस्थित प्रमुख मार्गदर्शिका डॉ. स्नेहल बैसाने यांनी किशोरवयीन मुलींना वाढत्या वयात येणाऱ्या समस्या व उपाय यावर विद्यार्थीनींशी प्रश्न व उत्तरांच्या माध्यमातून सुसंवाद साधून चर्चा व मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब संजय एल.पवार सरांनी किशोरी मेळाव्याची गरज व महत्त्व विशद केले.कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील श्रीमती एस.के.मोरे मॅडम व के.एन.पाटील मॅडम यांनी केले होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार