मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भिम अनुयायांना आधारस्तंभ एकता सामाजिक संस्था व दादर फेरीवाला संघटना आणि राहिवाशांच्यावतीने नक्षत्र मॉलच्या बाहेर उभारलेल्या मंडपातून अल्पोपहार आणि बाटलीबंद पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन आधारस्तंभ एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतिश थोरात यांनी केले होते. यावेळी संस्थेचे दिनेश थोरात, दत्ता कदम, संजय करळीकर, संदिप बोराडे, रविंद्र कदम, संजय चक्रे तसेच नक्षत्र मॉलचे चेअरमन तपन शाह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






