6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लोहारा ता.पाचोरा येथे रक्तदान शिबिर संपन्न.

Spread the love

दिनेश चौधरी,लोहारा.( प्रतिनिधी ) आज दि.6 डिसेंम्बर रोजी पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोहारा ता. पाचोरा येथे रामराज्य फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी जळगाव येथील रा.स्व.संघाच्या अंतर्गत माधवराव सदाशिवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांना रक्त संकलित करण्यासाठी बोलविण्यात आले होते. सकाळी ८:३० वाजता लोहारा शहर पत्रकार मंचाचे व नागरिकांच्या संमतीने जेष्ठ पत्रकार श्री.कृष्णा आप्पा शेळके यांचे हस्ते व सर्व पत्रकार सदस्य आणि संघटनेचे सर्व कार्यकर्ता व गावातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील मंडळी यांचे हस्ते भारत माता व पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून रक्तदानास सुरुवात करण्यात आली.

सदरचे रक्तदान हे सकाळी ८:३० वाजेपासून ते दुपारी १:३० वाजेपर्यंत सुरू होते, तरी गावातील सामाजि, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून ह्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. या वेळी महत्वाचे म्हणजे जो जो रक्तदान करेल त्याला ह्या वर्षाचा तरुण भारत यांनी प्रकाशित केलेला दिवाळी अंक तसेच डॉ गीते लोहारा यांनी त्यांचेकडून श्रीमद भगवत गीता भेट म्हणून देण्यात आली.

यावेळी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रामराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कोळी, सदस्य हेमंत गुरव, महेंद्र घोंगडे, मनोज अंबिकार, डॉ विकास पालिवाल, सागर कोळी, महेंद्र कोळी, समाधान कोळी, अमोल गोंधळे, गुणवंत क्षीरसागर, वाल्मिक कोळी, गोपाल कोळी, मंडपवाले राजू कोळी, अतुल कोळी, गोपाल पांढरे तसेच माणुसकी समूहाचे अध्यक्ष गजानन क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले.

हे पण वाचा

टीम झुंजार