एरंडोल :- तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा खर्ची बुद्रुक येथे जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्ताने कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला गावात जनजागृती रॅली काढण्यात आली . यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेलन केलर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पार्पण करून शाळेत प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देवून सन्मानित केले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रिंगणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमती मनीषा सोनवणे मॅडम यांनी भूषवले.
यावेळी खर्ची बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुखदेव पाटील सर यांनी प्रस्तावना केली . श्री.अभिमन पाटील सर यांनी दिव्यांगांना मदत नव्हे तर साथ हवी असते तसेच त्यांना समाजात प्रतिष्ठा कशी मिळवून देता येईल याविषयी उद्बोधन केले. या कार्यक्रमासाठी शा .व्य.स . अध्यक्ष मा.श्री अरुण शांताराम महाजन,खर्ची खुर्द शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र चित्ते, पालक – श्री .प्रवीण माळी श्री.योगेश माळी श्री.अमोल माळी उपस्थित होते यावेळी चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व विजेत्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आले.
शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती कुमावत मॅडम यांनी सुत्रसंचालन केले तर श्री भिमराव भालेराव सर यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली . कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षकवृंद व श्री गुरुदास शिंपी – IED तालुका समन्वयक , विशेष शिक्षक – श्री भिमराव भालेराव , श्रीमती सुनिता बडगुजर , श्रीमती ओजस्विता भावे यांनी परिश्रम घेतले .
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






