एरंडोल ते शेगाव पायीवारी 17 डिसेंबरला. 33 वर्षांपासून हजारो भक्तांचा समावेश.

Spread the love

एरंडोल – येथील श्रीसाई-गजानन संस्थानच्या वतीने काढण्यात येणा-या एरंडोल शेगाव पायीवारी १७ डिसेंबर पासून सुरु होत आहे.सुमारे तेहतीस वर्षांपासून अखंडपणे वारी काढण्यात येत असून दरवर्षी वारीत हजारो वारकरी सहभागी होत असतात.यावर्षी केवळ चारशे वारक-यांची वारी काढण्यात येणार असून ज्या भक्तांना वारीत सहभागी व्हायचे असेल अशा भक्तांनी साईगजानन मंदिरात संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन वारीचे प्रमख तथा संस्थानचे अध्यक्ष बापू मोरे आणि पदाधिका-यांनी केले आहे.

श्रीसाईगजानन संस्थानच्यावतीने दरवर्षी एरंडोल ते शेगाव पायी वारीचे आयोजन करण्यात येत आहे.तेहतीस वर्षांपासून काढण्यात येणा-या पायीवारीत शहरासह ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.वारीचा पहिला मुक्काम विटनेर,दुसरा मुक्काम जामनेर,तिसरा मुक्काम बोदवड,चौथा मुक्काम मलकापूर आणि सहावा मुक्काम नांदुरी येथे असतो.

वारीत दररोज रात्री सत्संगाचा कार्यक्रम होत असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थ देखील कार्यक्रमास उपस्थित राहत असतात.शिस्तबद्ध पद्धतीने निघणा-या वारीचे विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येत असते.यावर्षी केवळ चारशे वारक-यांची वारी काढण्यात येणार असून वारीत सहभागी होणा-या भाविकांनी मंदिरात नावनोंदणी करावी असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार