ब्लु बॉईज फाउंडेशन तर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

Spread the love

एरंडोल :- भीमनगर येथे ब्लु बॉईज फाउंडेशन कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मेणबत्ती लावून आदरांजली वाहण्यात आली.

तसेच लहान मुलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत भाषण केले.

कार्यक्रमाची सांगता बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.

ह्यावेळी ब्लु बॉईज फाउंडेशन चे सर्व सदस्य आणि भीमनगर येथील नागरिक व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते…

हे वाचलंत का ?

टीम झुंजार