धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे
धरणगाव — येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांना ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य, उपप्राचार्य व गुरुवर्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, समता शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य प्रा.डॉ.के.एम पाटील, मेजर प्रा.ए.डी.वळवी, उपप्राचार्य प्रा.आर.आर.पाटील, पर्यवेक्षक प्रा.बी.एल.खोंडे, प्रा.व्ही.आर.पाटील, प्रा.आर.ए.पाटील, प्रा.एस.आर.अत्तरदे, रितेशजी साळुंखे, राजूभाऊ चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देखील व्यक्त करण्यात आल्या.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






