मुंबई, दि. 8 :- संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
श्री संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांची सावली- खासदार रामदास तडस
नवी दिल्ली, 08 : संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराज यांची सावली असल्याचे प्रतिपादन वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी केले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आयोजित कार्यक्रमात श्री. तडस बोलत होते. याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित होते. श्री तडस यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण आदरांजली वाहिली.
संत तुकाराम महाराजांचे सर्वच अभंग त्यांना मुखोद्गत होते. त्यांनी या अभंगाचे पुनर्लेखन केले. परमार्थ कसा करावा यासंदर्भातील काही अभंग त्यांनी स्वत: लिहिले असल्याचे श्री. तडस यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.