पारोळा – तालुक्यातील मेहू ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच व सदस्य पदासाठी ७ जागेची काल माघारीची अंतिम प्रक्रिया पार पडली. यात गावातील सलोख्याचा व विकासाचा दृष्टीकोनातून लोकनियुक्त सरपंचपदासह ७ ग्रामपंचायत सदस्य आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील संमतीने जाहीर देण्यात आला. यात काल माघारीच्या कालावधीत संगनमत न झाल्याने आज आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इतर उमेदरावांनी जाहीर पाठींबा लेखी स्वरुपात देत निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच याबाबत माघार घेणाऱ्या उमेदवार वारांनी पत्रक देखील काढले आहे.
यात लोकनियुक्त सरपंच पदासाठी उमेदवार जिजाबाई गणेश पाटील यांना मनिषा सुरेश पाटील, सुनंदा रमेश पाटील, सीमा विकास पाटील यांनी एकमताने जाहीर पाठींबा दिला. तर प्रमिला मधुकर पाटील, कमल भानुदास पाटील, अनिल अर्जुन पाटील, बारकू रतन पाटील, मनिषा सुधाकर पाटील, भगवान पुंडलिक पाटील, सीमा विकास पाटील यांना देविदास निंबा पाटील, राजनंदिनी दर्शन पाटील, रविंद्र शिवाजी पाटील, सुरेश मन्साराम पाटील, भारती राजू हाटकर, सीमा राजू पाटील, पूनम उमेश बोरसे व जिजाबाई गणेश पाटील यांनी सदस्य पदासाठी जाहीर पाठींबा दर्शविला.
मेहू ग्रामपंचायतीवर आता जवळ जवळ बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिल्याने या ग्रामपंचायतीवर आता बाळासाहेबांचा शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध झाल्याचे स्पष्ट झाले असून आमदार मा.आबासाहेब चिमणराव पाटील यांनी लोकनियुक्त सरपंचासह बिनविरोध सदस्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. तसेच येणाऱ्या काळात गावातील मुलभूत सुविधेसह इतर विकासकामांचा लवकरच टप्प्या टप्प्याने कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देखील यावेळी आमदार मा.आबासाहेब चिमणराव पाटील यांनी नवनियुक्त शिष्टमंडळास दिले. यावेळी मा.पंचायत समिती सदस्य भिडूभाऊ जाधव, मंगरूळ सरपंच मुन्ना पाटील, मेहू लोकनियुक्त सरपंच विकास जगन्नाथ बोरसे, मुंदाणे
प्र.ऊ.मा.सरपंच एकनाथ पाटील, आडगांव पोलीस पाटील मनोहर मोरे, गणेश मोरे, मंगरूळ येथील भटू बन्सीलाल पाटील, मेहू येथील हिम्मत सुपडू पाटील, राजेंद्र लोटन पाटील, आनंदा पुंडलिक पाटील, जगदीश हरी पाटील, टिटवी येथील मदन महादू पाटील, चीखलोड येथील भूषण मधुकर पाटील, राजेंद्र सुरेश हाटकर, गणेश सुपडू पाटील, सुधाकर यशवंत पाटील, मांगो पुंडलिक हाटकर, मुमुराबाद येथील विनोद मधुकर पाटील, अजबराव रामचंद्र पाटील यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






