पारोळा :- येथील पोलिसांनी गावठी दारूविक्रेते देशी दारू विक्रेते व दारू भट्टी वाल्यावर १८ दिवसात २५ छ्यापे टाकून १,७८,२६५ रुपयांचा मुद्देमाल वर केली धडक कारवाई व 25 आरोपीवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली.त्यामुळे दारू विक्री करणारांचे धाबे दणाणले आहे.
गावठी दारू भट्टीवाले शांताराम चैत्राम पारधी शेवाळे खु यांचे दारू वर छापा टाकून 56000 रुपयांचा मुद्देमाल नाश केला तसेच अण्णा धर्मा वडर टिटवी यांची व सतीश आनंदा भिल पारोळा यांची दारुभट्टी नाश करून 82200 रुपयांचा मुद्देमाल नाश केला तसेच पारोळा, तरडी येथील 5 देशी दारू विक्रेते, राजवड,दळवेल, मराठखेडा, सारवें, भिलाली, पारोळा, रत्नपिंप्री, जोगलखेडा, शेवाळे खुर्द,टिटवी,बहादरपूर,महालपूर येथील – 17 अवैध गावठी दारू विक्रेते यांचेवर छ्यापे टाकून एकूण 25 छ्यापे टाकून एकूण 25 आरोपीवर गुन्हये दाखल करून एकूण 1,78,265 रुपयांचा मुद्देमाल नाश करून धडक कारवाई कारवाई करण्यात आली
असून नमुदची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, रवींद्र बागुल,पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, शेखर डोमाळे, बापू पाटील,जयवंत पाटील, इकबाल शेख,हे कॉ सुधीर चौधरी,हे कॉ नाना पवार,हे कॉ किशोर पाटील,हे कॉ विजय भोई,पो ना संदीप सातपुते,पो ना प्रवीण पाटील,पो ना प्रवीण पारधी,पो ना प्रदीप पाटील,पो ना योगेश जाधव,पो ना ज्ञानेश्वर सपकाळे,पो कॉ किशोर पाटील,पो कॉ राहुल कोळी,पो कॉ हेमचंद्र साबे,पो कॉ राहुल पाटील,पो कॉ आशिष गायकवाड,पो कॉ अभिजीत पाटील,पो कॉ नरेंद्र पाटील,पो कॉ निकम ,पो कॉ दुसाने यांनी केलेली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






