मुंबई, : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन २०२३ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.
यामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी गुरुवार, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रविवार, होळी (दुसरा दिवस) ७ मार्च मंगळवार ,गुढीपाडवा २२ मार्च बुधवार, रामनवमी ३० मार्च गुरुवार, महावीर जयंती ४ एप्रिल मंगळवार, गुड फ्रायडे ७ एप्रिल शुक्रवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल शुक्रवार,
महाराष्ट्र दिन १ मे सोमवार, बुद्ध पौर्णिमा ५ मे शुक्रवार, बकरी ईद (ईद उल झुआ) २८ जून बुधवार, मोहरम २९ जुलै शनिवार, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट मंगळवार, पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट बुधवार, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर मंगळवार, ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर गुरुवार, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर सोमवार, दसरा २४ ऑक्टोबर मंगळवार, दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर रविवार, दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर मंगळवार, गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर सोमवार, ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्य शासनाने आता भाऊबीज, बुधवार दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे. बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल २०२३ , शनिवार सुट्टी असून ती केवळ बँकांपुरती मर्यादित आहे. ही सुट्टी शासकीय कार्यालयांना लागू होणार नाहीत. या सार्वजनिक सुट्ट्यांबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.