धरणगाव :- सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळेचे माजी विद्यार्थी अँड. रविंद्र गजरे यांच्या सत्कार करण्यात आला.
या बाबत सविस्तर वार्ता अशी की, प्रतिकूल परिस्थिती व आर्थिक अडचणींवर मात करत एम ए इंग्लिश ,बी एड.,एम ए शिक्षण शास्त्र व नुकतेच कायदे क्षेत्रातील एलएलबी पदवी संपादन केल्याबद्दल तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्याच्या योगदानासाठी शाळेचे प्राचार्य शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे अँड रविंद्र गजरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रसंगी प्राचार्य जगदीश पवार, शाळेतील वरिष्ठ शिक्षक व्ही.टी माळी सर ,आढावे सर ,पी डी पाटील सर तसेच कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.आपल्या कायद्या च्या शिक्षणाचा ऊपयोग आपण गोरगरिबांना न्याय मिळवुन देन्या साठी करन्याचा मानस रविंद गजरे यांनी व्यक्त केला. तसेच त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






