जळगाव : – मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक व सामूहिक विवाह कक्ष च्या पश्चिम भारत राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते, खान्देश मराठा कुणबी वधू वर परिचय ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष. गौरी उद्योग समूह वावडदा चे चेअरमन सुमित जानकीराम पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
मराठा कुणबी समाजातील वधू वर संबंध जुळवण्याचे उत्कृष्ठ सामाजिक कामासाठी सुमित पाटील यांची सर्वत्र ख्याती आहे.कमी वयात मराठा समाजासाठी एक मोठे कार्य सुमित पाटील यांनी आतापर्यंत केले असून हजारो संबंध जोडले आहेत.विनाहुंडा विवाह संबंध जोडण्यासाठी,कमी खर्चात विवाह होण्यासाठी, समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात
तसेच जनजागृती करीत असतात.सामाजिक कार्यात देखील ते सतत पुढे असतात.अनेक सामाजिक संस्थेकडून त्यांना अनेक पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत.मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक व सामूहिक विवाह कक्ष च्या पश्चिम भारत राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून सुमित पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






