नांदेड :- कधी कौणाच नसिब चमकेल हे सांगता येत नाही अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. ट्रकमधील डिझेल कमी होणं आणि लॉटरी लागण्याचा काही संबंध आहे का? तुम्ही या प्रश्नाचं उत्तर नाही असं द्याल. मात्र ८ कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या महिलेनं याचा संबंध जोडला आहे. ट्रकमधील डिझेल कमी झाल्यानंच आपल्याला लॉटरी लागल्याचं महिलेनं सांगितलं.
महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या वैशाली नवर्यासोबत ट्रकनं शॉपिंगला गेल्या होत्या. यावेळी ट्रकमधील सिग्नल सुरू झाला. इंधन संपत असल्याची सूचना देणारी लाईट पेटू लागली. यानंतर वैशाली यांनी बाजारतळ्यातल्या पेट्रोल पंपावर ट्रक थांबवला.त्यांनी ट्रकमध्ये डिझेल भरलं.
पंपावर डिझेल भरत असताना वैशाली यांनी तिथे लॉटरीचं तिकीट काढलं. यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यांना लॉटरी लागली.वैशाली यांनी ८ कोटीपेक्षा अधिक रक्कम जिंकली. लॉटरी लागल्याचं समजताच त्यांना प्रचंड आनंद झाला. आपल्याला लॉटरी लागली आहे, यावर त्यांना बराच वेळ विश्वासच बसला नाही.
ज्या परिस्थितीत लॉटरी लागली त्याबद्दल वेशाली यांना सर्वाधिक आश्चर्य वाटलं. त्या दिवशी ट्रकमधील इंधन संपल्याचा सिग्नल पेटलाच नसता तर मी लॉटरीचं तिकिट खरेदीच केलं नसतं. त्यामुळे जुळून आलेल्या योगायोगानं चकित झाल्याचं वैशाली यांनी सांगितलं.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






