एरंडोल तालुकास्तरीय जि.प. कर्मचारी क्रीडा स्पर्धांचे गटविकास अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

Spread the love


एरंडोल :- जिल्हा परिषद जळगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय पंकज आशिया साहेब याच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा एरंडोल पंचायत समिती मार्फत सदरील स्पर्धांचे उद्घाघाटन आर. टी. काबरा शाळेच्या मैदानात एरंडोल पंचायत समितीचे गटविकास आदरणीय जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनप्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय आर. डी. महाजन साहेब , ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आर. एस. सपकाळे साहेब , कृषी विस्तार अधिकारी पटाईत साहेब , सांख्यिकी विस्तार अधिकारी पी. एल . सपकाळे साहेब ,आर. टी. काबरा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानुधने मॅडम , तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख , शिक्षक बांधव व भगिनी उपस्थित होते .

प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात गटविकास अधिकारी आदरणीय जाधव साहेब व गटशिक्षणाधिकारी आ. डी. महाजन साहेब यांच्या हस्ते स्पर्धांची सुरुवात करण्यात आली .सदरील स्पर्धा जि. प. चे विविध विभागाचे कर्मचारी तसेच शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. त्यात क्रिकेट, व्हॉलीबॉल , कबड्डी ,खो-खो, बॅडमिंटन , बुद्धीबळ , कॅरम, सांस्कृतिक स्पर्धांमध्ये गीत गायन, नाट्यीकरण , नृत्य अशा विविध स्पर्धा पार पडणार आहेत. तदनंतर व्यक्तिगत तसेच सांघिक खेळातील विजेते जिल्हास्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करून स्पर्धा खेळणार आहेत.

सदरील स्पर्धे प्रसंगी शिक्षक वर्गामध्ये खूपच उत्साह दिसून आला. तालुकास्तरीय सर्व स्पर्धांचे यशस्वीतेसाठी आयोजन-नियोजन एरंडोल तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच तापीराम पाटील सर, हेमंत सोनवणे सर , वसीम शेख सर , वसीम अहमद सर , इम्रान सर , सचिन सरकटे सर , भुषण बाजीराव पाटील सर , हर्षल पाटील तसेच इतर शिक्षक बांधव व शिक्षक भगिनी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय आर. डी. महाजन साहेब यांनी तर सूत्रसंचालन क्षमा साळी मॅडम व आभार प्रदर्शन भूषण पाटील सर यांनी केले .

हे पण वाचा

टीम झुंजार