⚫अमरावती विभागीय शिक्षक संघाच्या वतीने शासन निर्णयाचा जाहीर निषेध⚫
????अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना कायमस्वरूपी व सरसकट समायोजनाचा शासन निर्णय निर्गमित करा.????
अमरावती :- अनुदानित शाळेतील शिक्षकांप्रमाणे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे यासाठी मा.ॲड श्री किरणराव सरनाईक यांनी कित्येक दिवसापासून मागणी केली होती.आज दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी शासनाने या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला. मात्र हा निर्णय निव्वळ धूळफेक व शिक्षकांची कृर थट्टा करणारा आहे.
या शासन निर्णयानुसार अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे समायोजन फक्त अंशतः अनुदानित शाळेतील रिक्त असलेल्या जागेवरच होणार. जोपर्यंत समायोजन होणार नाही, त्यादरम्यान कुठलेही वेतन-भत्ते अनुदेय राहणार नाहीत. हा निर्णय सत्र 2022-23 करिताच लागू असेल. यावरून ही शिक्षकांची चक्क फसवणूक आहे. या निर्णयामुळे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक कसेबसे 20 टक्के, 40 टक्के अनुदानावर आले. जर विद्यार्थ्या अभावी त्यातील काही अतिरिक्त ठरले तर त्यांच्या समायोजनासाठी कुठल्याही अंशतः अनुदानित शाळेत जागा क्वचितच रिक्त राहतील. त्यामुळे अशा आशयाचा निर्णय कसा होऊ शकतो? अमरावती विभागीय शिक्षक संघाच्या वतीने मा. किरणराव सरनाईक यांनी या शासन निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे. श्री किरण सरनाईक हे या निर्णयाविरुद्ध शासनाकडे पाठपुरावा करून हा निर्णय रद्द करून खऱ्या अर्थाने शिक्षकांना दिलासा देणारा निर्णय निर्गमित करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहतील.
अमरावती विभागीय शिक्षक संघ
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






