नाशिक — येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन भवनात आज विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठक भ.नि.स.अ. तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा उपआयुक्त (महसूल) उन्मेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम वि.भ.नि.स.अशासकीय सदस्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तद्नंतर अध्यक्ष म.आयुक्त महोदयांनी समितीचा कार्यकाळ, कार्यकक्षा, कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. आज रोजी एकही प्रलंबित अर्ज नसल्याने बैठकीची सांगता चहापानाने झाली.
याप्रसंगी वि.भ.नि.स.अशासकीय ५ सदस्यांपैकी ३ सदस्य बैठकीला हजर होते. यामध्ये निवृत्ती बळवंत कापसे (गणेशगाव पो.पिंपळगाव गरुडेश्वर, नाशिक), सरदारसिंग रूपसिंग वसावे (मु.पो.मोलगी ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार), लक्ष्मण प्रभाकर पाटील (धरणगाव ता.धरणगाव जि. जळगांव) उपस्थित होते. याप्रसंगी म. आयुक्त राधाकृष्ण गमे, म. उप आयुक्त उन्मेश महाजन यांच्या हस्ते अशासकीय सदस्यांना बैठकीचा अहवाल देण्यात आला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






