महापुरुषांच्या बदनामी केलेल्या वक्तव्य च्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी ,लोकसंघर्ष मोर्चा व सर्व पुरोगामी संघटनांनी रस्ता रोको आंदोलन .

Spread the love

जळगाव – राज्यपाल भरतसिंग कोश्यारी व चंद्रकांत पाटीय यांनी छ.शिवाजी महाराज,म.फुले, सावित्रीमाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने आज भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी ,लोकसंघर्ष मोर्चा व सर्व पुरोगामी संघटनांनी रस्ता रोको आंदोलन केले.
या रस्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व सुमित्र अहिरे (महाराष्ट्र राज्य सहसंयोजक बहुजन क्रांती मोर्चा)मोहन शिंदे (राज्य महासचिव भारत मुक्ती मोर्चा)यांनी केले.


या आंदोलनात सुनिल देहडे,विजय सुरवाडे,अमजद रंगरेज,सुरेश सपकाळे, डॉ.शाकीर शेख,नारायण सोनवणे,भावलाल सोनवणे,रतन जोहरे,सुरेश धनगर, योगेश सोनवणे,अशोक सपकाळे, विनोद निकम, शशिकांत हिंगोणेकर, भगवान कांबळे,संजय कदम,देवानंद निकम,भागवत जाधव,खुशाल सोनवणे,सुकलाल पेंढारकर,आदिंनी सहभाग नोंदवला.
या सर्व कार्यकर्त्यांना जळगाव तालुका पोलिसांनी अटक केली. या सोबत लोकसंघर्ष मोर्चाचे,व जळगाव जिल्ह्यातील पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते यांनी सुध्दा अटक करवुन घेतली.

टीम झुंजार