जळगाव : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव शहरातील मेहरुण परिसरात राहणाऱ्या व विद्यापीठात कंत्राटी सफाई कर्मचारी असणारा तरुण शनिवारपासून घरातून बेपत्ता होता. या तरुणाचा मृतदेह निमखेडी शिवारातील महापालिकेच्या कचरा डंपीग मैदान परिसरातील झुडपांमध्ये आढळून आला आहे. या तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३) असे मृत तरुणाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं ?
जळगाव शहरातील मेहरुण परिसरात कुटुंबासह राहणारा प्रमोद उर्फ भूषण शेट्टी विद्यापीठात कंत्राटी तत्वावर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तो नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी विद्यापीठात ड्युटीवर गेला होता. ड्युटी संपल्यावर तो ४ वाजेपर्यंत नेहमीच्यावेळी घरी आला नाही. प्रमोद घरी न परतल्याने त्याच्या पत्नीसह सर्वांनाच काळजी लागली होती. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतल्यावर देखील शनिवारी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी शनिवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलिसात तो बेपत्ता झाल्याची खबर दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात नोंदही करण्यात आली. त्यानंतर देखील कुटुंबीयांसह पोलिसांकडून त्याचा शोध सुरुच होता.
सोमवारी आढळला मृतदेह
जळगावातील निमखेडी परिसरातील महापालिकेच्या कचरा डंपिंग मैदान परिसराजवळील लोखंडी रेल्वेपुलाजवळ गेल्या दोन दिवसांपासून या तरुणाची दुचाकी बेवारसपणे लागून होती. आज सोमवारी सकाळी देखील बकऱ्या चारणाऱ्या काही मुलांनी दुचाकीजवळील परिसरात पाहिले असता, त्यांना झुडपांमध्ये एक मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्याच्या खिशात मिळालेल्या ओळखपत्रावरुन त्याची ओळख पटवली. त्यांच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावल्यावर मृतदेह प्रमोदचाच असल्याची खात्री झाली.
चाकूचे वार; डोक्यावर दगडाने हल्ला
दरम्यान, पोलिसांनी तपासणी करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. प्रमोदच्या मृतदेहावर चाकूने वार केलेल्या जखमा आहेत. तसेच त्याच्या डोक्यावर दगड घालण्यात आल्याचेही प्राथमिक तपासणीत दिसत आहे. त्याचा खून करुन मृतदेह झुडपांमध्ये फेकून दिला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कुटुंबियांना धक्का
मृत प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. बेपत्ता झालेल्या प्रमोदचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
हे वाचलंत का ?
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.