इनरव्हिल क्लब ऑफ संगम येथे राष्ट्रीय बालिका दिन साजरा

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी :- नेहा राजपूत

चाळीसगाव :- इनरव्हिल क्लब ऑफ संगम येथे प्रेसिडेंट व पदाधिकारी यांनी विविध शाळांमध्ये ” 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन ” साजरा केला.प्रेसिडेंट श्रीमती चंद्रकला साळुंखे यांनी आजचा दिवस बालिका दिन म्हणून का साजरा करतात ते सांगितले .24 जानेवारी रोजी इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसल्या होत्या .त्यामुळे महिला शक्ती म्हणून ह्या दिवशी इंदिरा गांधीचे स्मरण केले जाते . याच दिवशी ” धनलक्ष्मी सबला ” योजना राबविण्यात आल्या होत्या हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश मुलींना , विशेषता किशोरवयीन मुलींना सक्षम करणे हा आहे .

जेणेकरुन त्या भविष्यात एक चांगला समाज घडविण्यासाठी योगदान देवू शकतील . प्रा डॉ साधना निकम यांनी मुलींना कौटुंबिक हिंसाचार , बालविवाह , हुंडाबळी यासारख्या गोष्टी बाबत जागरुकता मिळावी म्हणून मार्गदर्शन केले.सौ श्रध्दा ठाकूर यांनी सांगितले की भाग्यवान पालकांकडेच कन्या जन्माला येते लक्ष्मीच्या रुपाने ती प्रत्येकाच्या घरात जन्म घेवून घरात सुख , समृद्धी , ऐश्वर्य व आनंद आणते असे सांगितले .सौ लतिका पाटील यांनी सांगितले की ह्या दिवशी बालिकांचा योग्य सन्मान केला पाहिजे , योग्य संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजे ह्याच बालिका पुढे दोन कुळांचा उध्दार करीत असतात .म्हणून आजच्या दिवशी अध्यक्ष चंद्रकला साळुंखे यांनी बालिकांचे पाय धुवून पूजा केली , प्रत्येक बालिकेला गुलाबपुष्प , वही ,पेन , चॉकलेट व तिळगुळ देवून सन्मानित केले .असाच बालिका दिन वेगवेगळ्या शाळांमध्ये जावून साजरा केला गेला .बालिकांनी पण आज विविध प्रकारची वेशभूषा केलेली होती .
एकंदरीत ” राष्ट्रीय बालिका दिन ” पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये जावून खूप उत्साहाने व आनंदाने साजरा केला .

टीम झुंजार