Indian Army Recruitment: बारावी उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट ऑफिसर बनण्याची संधी मिळणार आहे. अविवाहित पुरुष उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. बारावी परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (म्हणजे PCM) विषयांसह गणित या विषयांपैकी एक विषय म्हणून उत्तीर्ण, जेईई मेन २०२२ च्या परीक्षेत बसलेल्या आणि सैन्यात कायमस्वरूपी अनुदान आयोगासाठी पात्रता अटी पूर्ण केलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत.
Indian Army Recruitment: बारावी उत्तीर्ण तरुणांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय लष्करातर्फे या पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय सैन्यात टीईएस-४९ मध्ये ९० रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. भारतीय लष्कराच्या तांत्रिक प्रवेश योजनेअंतर्गत, टीईएस-४९ साठी अधिकृत वेबसाइट
joinindianarmy.nic.in वर ३० डिसेंबरपर्यंत अर्ज पाठविता येणार आहे.
या पदभरती अंतर्गत एकूण ९० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. चार वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, कॅडेट्सना लष्करात लेफ्टनंट पदावर कायमस्वरूपी भरती केले जाईल. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.






