बिड : – टिक टॉक स्टार म्हणून अत्यंत कमी वेळेमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करणारा बीडमधील संतोष मुंडे याचा आज दुर्देवी मृत्यू टिक टॉक स्टार संतोष मुंडेसह बाबुराव मुंडे या दोन युवकांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भोगलवाडी येथे आज (दि.13 मंगळवारी) सांयकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील टिक टॉक स्टार संतोष मुंडे व त्याचा मित्र बाबुराव मुंडे हे दोघे भोगलवाडी ते काळेचीवाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विज आल्यामुळे दोघांचा करंट लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
पहा व्हिडिओ :
या घटनेची माहिती कळताच समाज माध्यमातून तीव्र दुखः व्यक्त केले जात आहे. संतोष मुंडे याने टिक टॉकच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याला मोठ्या प्रमाणात फॉलोवर असून त्याच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त होत आहे. घटनेची नोंद धारुर पोलिसांत केली जात आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






