जळगाव : – सध्या महाराष्ट्रात रोज नवीन नवीन घटना घडत असतात अशिच एक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे.’बाहुबली’ चित्रपटात ज्याप्रमाणे अभिनेता प्रभास महादेवाची पिंड मूळ जागेवरून खोदून काढतो व वाहत्या पाण्याच्या धबधब्या खाली ठेवतो, असाच काहीसा प्रकार यावल तालुक्यातील साकळी गावात सोमवारी उघडकीस आला आहे. गावातीलच पाटचारी जवळील श्री पाटेश्वर महादेव मंदिरातील श्री महादेवांच्या पिंडीची तोडफोड करून खोदून ती कोणीतरी अज्ञात माथेफिरूने थेट जवळच्या पाटचारीच्या पाण्यात टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बाहुबली चित्रपटातील एका दृष्यात जेव्हा प्रभास आपल्या आईला महादेवाच्या पिंडावर पाणी घालण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागत असल्याचे पाहतो, तेव्हा तो थेट महादेवाची पिंड खोदून खांद्यावर घेतो आणि पाण्याच्या धबधब्या खाली ठेवतो. सिनेमातील हे दृष्य लोकप्रिय ठरले, आता अशीच काहीशी घटना यावल तालुक्यातील साकळी येथे उघडकीस आली आहे .
साकळी गवाजवळील पिळोदा रस्त्यालगत असलेल्या हतनूर पाटचारी जवळ श्री पाटेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात भव्य अशी वजनदार महादेवाची पिंड एका काँक्रीट ओट्यावर स्थापित होती. या देवस्थानाचे बांधकाम लोकवर्गणीतून सुरू आहे. भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून हे देवस्थान साकळीसह पंचक्रोशीत परिचित आहे.
रविवारी सकाळी जेव्हा भाविक येथे दर्शनासाठी आले तेव्हा मंदिरातील महादेवाची पिंड जागेवर नसल्याचे दिसून आले. तेव्हा त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली असता महादेवाची पिंड मंदिरातून खोदून जवळच असलेल्या हतनूरच्या पाटाच्या चारीत पाण्यात बुडालेली आढळून आली.
घटनेची माहिती मिळाल्यावर यावल पोलीस ठाण्याचे घटनास्थळी पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर, हवालदार सिंकदर तडवी, युनूस तडवी, बालक बाऱ्हे, रोहिल गणेश आदी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महादेवाची पिंड ताब्यात घेतली आहे .
पहा व्हिडिओ :
तर या घटनेमुळे गावातून संताप व्यक्त केला जात असून अशा प्रकारचं कृत्य करून धार्मिक भावना भडकवणाऱ्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अशोक शंकर भिल यांच्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सिंकदर तडवी करीत आहे.
मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी –
अज्ञात समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी :
श्री महादेवांच्या पिंडाची तोडफोड केल्याची माहिती मिळताच मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक, भक्तांनी गर्दी केली होती. श्री पाटेश्वर महादेव मंदिर हे जागृत देवस्थान असल्याने या मंदिरात दररोज अनेक भाविक- भक्त येऊन दर्शन घेतात. तर श्रावण महिन्यात देवाचे मनोभावे विधी होत असतात. श्री महादेवाची पिंड खोदून काढणाऱ्यांचा निषेध करीत महादेवाच्या पिंडीची स्थापित मूर्ती हलवून तिची विटंबना करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदींकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
श्री महादेवाची पिंड खोदून काढणाऱ्यांचा निषेध करीत महादेवाच्या पिंडीची स्थापित मूर्ती हलवून तिची विटंबना करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांसह भाविकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.